विश्वासार्ह संकलन
ब्लिसफूल नाशिक संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वस्तू अथवा उत्पादनाचे संकलन हे धार्मिक परंपरा आणि सेवांची विश्वासार्हता जपून पूर्णपणे पारदर्शकपणे केले जाते. या वस्तु, उत्पादनांचा वापर केवळ धार्मिक व पूजा-विधींसाठीच्या उद्देशांसाठी असतो, हे लक्षात घेऊनच अधिकृत, विश्वासार्ह पुरोहित, संस्था, व्यक्ती यांच्याकडून वस्तुंचे संकलन केले जाते.


QR द्वारे पडताळणी
आमच्या निवडक उत्पादनांवर क्यू-आर कोड आधारित पडताळणी उपलब्ध आहे, यामुळे भाविकांना संबंधित उत्पादनाची माहिती, उगमस्थान आणि संकलनाचा तपशील बघता येईल. परिणामी विश्वासार्हता आणि पावित्र्यतेची निश्चिती करता येईल.
श्रद्धापूर्वक हाताळणी
प्रत्येक वस्तूचे पावित्र्य जपण्यासाठी त्या वस्तूची स्वच्छ व शुद्ध वातावरणात पॅकिंग केली जाते. विशेष म्हणजे पूजासाहित्यातील प्रत्येक पवित्र वस्तूच्या पावित्र्याला कुठेही बाधा पोहोचू नये, यासाठी शुद्ध वातावरणात, तिचे आध्यात्मिक महत्व लक्षात घेऊन काळजीपूर्वक हाताळणी केली जाते


आकर्षक पॅकिंग
स्वच्छता आणि आध्यात्मिक भावनेतून आम्ही वस्तुंची पॅकेजिंग केलेली आहे. कारण, केवळ उत्पादन देणे नव्हे तर पवित्रतेचा स्पर्श भाविकांपर्यंत पोहोचवणे आहे, हा आमचा मूळ हेतू आहे. म्हणूनच, भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत पूजासाहित्य किंवा अन्य उत्पादने शुद्ध स्वरुपात भाविकांना प्राप्त होत आहेत.
कायदेशीर सूचना
ब्लिसफूल नाशिक संस्था ही केवळ सेवेचे माध्यम म्हणून काम करते. या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणारी आध्यात्मिक उत्पादने आणि धार्मिक सेवा या पारंपरिक व भक्तिपूर्ण उद्देशांसाठी आहेत. भाविकांच्या श्रद्धेचा, आत्मियतेचा आणि विश्वासाचा भाग म्हणून त्यांच्यासाठी या सेवा आहेत. या सेवांच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही अलौकिक परिणामांची किंवा विशिष्ट फलश्रुतीची हमी देत नाही. श्रद्धा ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक आध्यात्मिक यात्रा असते आणि व्यक्तीपरत्वे त्यात बदल होऊ शकतात.

