


ब्लिसफूल नाशिकच्या माध्यमातून पर्यटक व भाविकांना विश्वसनीय, विविध आर्थिक पर्यायांसह प्रमाणित धार्मिक विधी, सेवा, तीर्थयात्रा अनुभूती आणि आध्यात्मिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पूजा, विधी, शांती, यज्ञ, अस्थी विसर्जन यांसारखे पारंपरिक धार्मिक विधी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अनुभवी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले जातात. या सुविधांचे बुकिंग करण्यासाठी सेवा बुकिंग पेजला एकदा आवर्जून भेट द्या! नाशिक-त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्राचे आध्यात्मिक महत्व यापुढेही अबाधित राहावे, भाविकांसह पर्यटकांना चांगला अनुभव मिळावा, त्यांचा प्रवास सुरक्षित आणि स्मरणीय राहावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक स्थळांचे, मंदिरांचे आध्यात्मिक महत्व, विविध पूजा-विधी, महत्वाचे दिवस आणि घडामोडींची विश्वसनीय माहिती व्हिडिओंच्या माध्यमातून देत भाविक व पर्यटकांना आध्यात्मिक आनंदानुभूती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाशिक दर्शन, पवित्र धार्मिक विधी, अनुभवी गुरुजी आणि आध्यात्मिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ज्योतिष, अध्यात्म, पौराणिक ग्रंथ, परंपरा, सण-उत्सवांची सखोल माहिती याद्वारे दिली जाईल. कुंभ जलासारख्या पवित्र तीर्थाचे आध्यात्मिक महत्व आणि प्रत्येक परंपरा ही श्रद्धा व मानवी जीवनाशी कशी जोडलेली आहे, हे याद्वारे समजून घेण्यास मदत होईल. याशिवाय धार्मिक कर्मकांड आणि पूजा-विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे महत्व, एखाद्या महत्वाच्या सणाचे महत्व, पूजेची मांडणी, अध्यात्मिक उपदेश, घरगुती समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी लहान-सहान उपाय याबाबतदेखील सविस्तर मार्गदर्शन भाविकांना या व्हिडिओंच्या माध्यमातून मिळणार आहे. ऐतिहासिक वारसास्थळांसह गड-किल्ल्यांची विश्वासार्ह माहितीदेखील त्या ठिकाणांच्या प्रत्यक्ष भेटीतून मिळणार आहे.

भाविकांसह पर्यटकांना विश्वासार्ह, प्रमाणित, परवडणारे आणि सर्वार्थाने आनंददायी धार्मिक तिर्थाटन, पर्यटन घडावे, यासाठी ब्लिसफूल नाशिक कटिबद्ध आहे. विशेषतः या सर्व सेवांमध्ये पूजा, विधी, शांती, यज्ञ, अस्थी विसर्जन यांसारख्या पारंपरिक धार्मिक विधी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अनुभवी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले जातात. तसेच, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक व पौराणिक महत्व असलेली मंदिरे, गड-किल्ल्यांसह पर्यटनस्थळांची सफर करण्याचा पर्यायदेखील BLISSFUL NASHIK संस्थेने आपल्या सहयोगी तज्ज्ञ व्यक्ती, गाईड आणि संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे.

ब्लिसफूल नाशिकच्या माध्यमातून पर्यटक व भाविकांना विश्वसनीय, विविध आर्थिक पर्यायांसह प्रमाणित धार्मिक विधी, सेवा, तीर्थयात्रा अनुभूती आणि आध्यात्मिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. देशातील अत्यंत पवित्र आणि पूजनीय तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील दिव्य परंपरा, आध्यात्मिक वारसा आणि धार्मिक संस्कृतीशी जगभरातील भाविकांना जोडण्याच्या पवित्र उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. कुंभजल, अस्सल रुद्राक्ष, यंत्र, प्रसाद, पूजा-विधींची व्यवस्था, अस्थी विसर्जन, अध्यात्मिक मार्गदर्शन आणि भाविकांसाठी विश्वासार्ह सेवा-सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने BLISSFUL NASHIK संस्थेची सुरुवात झाली. नाशिकला येणाऱ्या प्रत्येक भाविक, पर्यटकाला येथील दर्शन, पूजा, खाद्यपरंपरा यांची आनंदानुभूती मिळावी, यासाठी आम्ही विशेष प्रयत्नशील आहोत. वरिष्ठ अधिकारी, संत-महंत यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा भक्तीच्या वाटेवरचा प्रवास सुरू आहे.
विश्वासार्हता
ब्लिसफूल नाशिकमध्ये प्रत्येक सेवा आणि प्रत्येक उत्पादनामागे अस्सलता हाच प्रमुख पाया आहे. सर्व पवित्र उत्पादने आणि पूजासाहित्य त्याचे पावित्र्य कायम ठेवत काळजीपूर्वक संकलित केले जाते. प्रसादापासून ते रुद्राक्ष, यंत्रे आणि इतर पूजासाहित्याची निवड शुद्धता, परंपरा आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन केली जाते. याशिवाय, महत्त्वाच्या उत्पादनांसोबत क्यू-आर कोड दिला जातो, ज्याद्वारे भाविकांना त्या उत्पादनाची माहिती, स्त्रोत आणि अस्सलतेची खात्री करता येते. काही उत्पादनांसाठी प्रमाणित लॅब रिपोर्ट दिले जातात, ज्यामुळे त्यांच्या शुद्धतेबाबत भाविकांमधील विश्वास अधिक दृढ होतो.


ब्लिसफूल नाशिकच्या माध्यमातून सर्व सेवा भक्तीभाव, सेवाभाव आणि खात्रीशीर पुरविल्या जातात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र परंपरांचा, दर्शनाचा आणि पर्यटनाचे भाविकांना आध्यात्मिक समाधान मिळावे, हाच आमच्या सेवेचा प्रमुख हेतू आहे. पूजा, विधी, शांती, अस्थी विसर्जन, यज्ञ, तसेच तीर्थयात्रा, मंदिर दर्शन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन यांसारख्या सेवा देतानाही आम्ही कुठेही तडजोड होणार नाही, याची काळजी घेतो. म्हणूनच प्रत्येक धार्मिक सेवा योग्य परंपरेनुसार पार पडावी यासाठी आम्ही अनुभवी पुरोहित, जाणकार मार्गदर्शक आणि विश्वासार्ह स्थानिक सहकाऱ्यांची मदत घेतली आहे. याच पाठबळावर आम्ही अस्सल पूजासाहित्य आणि इतर सेवा इतरांच्या तुलनेत परवडतील अशा दरांत उपलब्ध करून दिल्या आहेत.
