
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती, गर्दी व्यवस्थापन, सूक्ष्म नियोजन आणि कामे वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा भर.

नाशिक – जिल्ह्यातील धार्मिक व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच तीर्थक्षेत्रांचा नियोजनबद्ध विकास करण्यावर शासनाचा भर आहे. इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कपिला तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पालकमंत्री महाजन यांनी कावनई येथील कपिला तीर्थक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी तीर्थक्षेत्राची पाहणी करून परिसरातील…

(पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, साधुग्राम, घाट विकास आणि नागरी सुविधांवर भर; विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश) नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रभावीपणे करता यावे आणि आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उभ्या राहाव्यात, यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. पार्किंगची ठिकाणे, वाहतुकीचे…

(गंगापूरमध्ये ९५.१८ टक्के, दारणा ९८.२८ टक्के; ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणापूर्वी त्र्यंबकेश्वरच्या जलव्यवस्थेची तयारी पूर्ण करण्याचे आव्हान) नाशिक । यंदाच्या पावसाळ्यानंतर नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १२५ धरणांमधील एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ९३.३१ टक्के होता. मात्र, गेल्या…

नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची अधिकृत सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. त्या दिवशी दुपारी १२:०२ वाजता — अभिजित मुहूर्तावर — नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थ या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण होईल. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ठिकाणच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर दुसऱ्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…