सिंहस्थात एअर कनेक्टिविटीचा पर्याय; त्र्यंबकेश्वर येथे ३ हेलिपोर्ट तयार

सिंहस्थात एअर कनेक्टिविटीचा पर्याय; त्र्यंबकेश्वर येथे ३ हेलिपोर्ट तयार

नाशिक : धार्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच प्रवासाचा वेळ वाचावा आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी या ठिकाणी ३ हेलिपोर्ट उभाणीचे काम सुरू आहे. या हवाई सेवेमुळे मुंबई, सूरत, जळगाव अशा ४० मिनिटांच्या अंतरावरील शहरांमधील भाविकांना काही तासांत दर्शन घेऊन परतणे शक्य होणार आहे.

हेलिकॉप्टर सेवेच्या माध्यमातून नाशिकपासून हवाई मार्गाने सुमारे ४० मिनिटांच्या अंतरावरील मुंबई, नवी मुंबई, सूरत, वडोदरा, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमधून येणार्‍या भाविकांना त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येणे सुलभ होईल. सिंहस्थाच्या पर्वणीकाळात देशभरातून कोट्यवधी भाविक दाखल होण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाकडून वाहतूक, निवास, दर्शन, आरोग्य, सुरक्षा आणि अन्य सुविधांच्या नियोजनावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमध्ये हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचे नियोजन निश्चित झाले आहे. सद्यस्थितीत या सेवेसाठी हवाई वाहतूक कंपन्यांना कळविण्यात आले असून, कंपन्यांची तयारी असल्यास १ नोव्हेंबरपासून म्हणजे पुढील ८ दिवसांत हवाई सेवा सुरू होईल.

अवघ्या तासाभरात होणार दर्शन

हवाई सेवेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताम कमी होण्यास मदत होईल. हेलिकॉप्टरद्वारे त्र्यंबकेश्वर येथे पोहोचल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शन घेऊन परतीचा प्रवास करता येईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे तासाभराचा कालावधी अपेक्षित असेल. हेलिकॉप्टरने येणार्‍या भाविकांसाठी २,५०० रुपयांचे व्हीआयपी दर्शन पास उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे हवाई प्रवास करून येणार्‍या भाविकांना मंदिरात दर्शन घेण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

🎬 ही बातमी व्हिडिओमध्ये पहा

अशाच अपडेटसाठी Blissful Nashik YouTube चॅनेलला Subscribe करा आणि Instagram वर Follow करा.

🎥 व्हिडिओ बातम्या पाहायच्या आहेत? कुंभमेळा २०२७ चे व्हिडिओ, वार्तांकन आणि थेट प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेलवर पाहा.

▶ YouTube चॅनेल पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *