नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा प्रारंभ ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रामतीर्थ (नाशिक) आणि कुशावर्त तीर्थ (त्र्यंबकेश्वर) येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याने झाला आहे. आता २०२७ मध्ये होणाऱ्या अमृतस्नानांची भाविकांना प्रतीक्षा आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार, २९ जुलै २०२७ रोजी नाशिकमध्ये नगरप्रदक्षिणा होणार आहे. २ ऑगस्टला पहिले अमृतस्नान, तर ३१ ऑगस्टला दुसरे अमृतस्नान होणार आहे. तिसरे अमृतस्नान ११ सप्टेंबर रोजी नाशिकमधील रामतीर्थावर तर १२ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर होणार आहे.
सिंहस्थ पर्वाची सांगता २४ जुलै २०२८ रोजी ध्वजावतरणाने होणार आहे. भाविकांना या धार्मिक सोहळ्यांचे नियोजन करता यावे यासाठी या महत्त्वाच्या तारखा आणि विशेष कार्यक्रमांची ही माहितीपर सारणी आहे.







Leave a Reply